समितीचे कार्य व कार्यक्षेत्र
ही समिती सल्लागार आणि संमंत्रक ( कनस्लटेटीव्ह ) मंडळ असेल आणि हज समिती मुंबई व “हाजमित्र” यांचा संबंध साधणारा दुवा म्हणुन काम करील. ह्या समितीची मुख्य कर्तव्ये खालील प्रमाणे असतील :-
१. इच्छुक हाज यात्रेकरुंसाठी उपयुक्त माहिती गोळा करणे व तिचा प्रसार करणे.
२. “हाजमित्र” ची नेमणुक करणे आणि जिल्हा स्तरावर हाज उपसमित्यांची नियुक्ती करणे.
३. हाज यात्रेकरुंसाठी लस टोचणी, वैद्यकीय तपासणी, यात्रापरवाने मिळूवून देणे, अग्रिम रक्कम जमा करणे तसेच ह्या बाबींशी संबंधित प्राधिकाऱ्यांना सहकार्य करणे, ह्या सारख्या गोष्टींबाबत इच्छुक हजयात्रेकरुंना सल्ला देणे व सहाय्य करणे.
४. हज यात्रेकरुंना प्रवास सुविधा मिळाव्यात याकरिता रेल्वे प्राधिकाऱ्यांशी वाटाघाटी करणे व सहकार्य करणे.
५. हज यात्रेकरुंच्या गाऱ्हाण्यांकडे संबंधित प्राधिकाऱ्याचे लक्ष वेधणे व त्यावर उपाययोजना सूचविणे.
६. इच्छुक हज यात्रेकरुंना हज यात्रा करण्यात उपयुक्त वाटणाऱ्या इतर काही गोष्टी करणे.